वैदिक संशोधन मंडळ, संकेतस्थळ

सप्रेम नमस्कार!!
आपणा सर्वांना हे कळविण्यास आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की – आज मंगळवार, दि.२६ जानेवारी २०२१ रोजी, भारताच्या ७२व्या प्रजासत्ताक दिनाच्या पर्वणीवर, सकाळी ८:०० वाजता वैदिक संशोधन मंडळ, पुणे (आदर्श संस्कृत शोध संस्था) यांच्या आंतर्जालीय संकेतस्थळाचे ( Website चे) लोकार्पण मा. डॉ. सरोजा भाटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. आता संस्थेचे विविध उपक्रम, प्रकाशने यांविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. वेदांच्या, यज्ञांच्या अभ्यासकांनी आणि उपासकांनी तसच वैदिकसंस्कृती, श्रौतयज्ञपरंपरा यांविषयी ज्यांना आस्था, जिज्ञासा आहे अशा सर्वांनीच या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी.

संकेतस्थळ –
https://www.dheemahi.in/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*